वाशी खाडी पुलावरून उडी घेणाऱ्या महिलेला पोलिसांनी वाचविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vashi-creek-bridge

आत्महत्या करण्यासाठी वाशी खाडी पुलावर आलेली महिला पाण्यात उडी मारण्याच्या तयारीत असताना वाहतूक पोलिसांनी तिला सावरले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा प्रकार आज सायंकाळी घडला.

कोपरखैरणे येथे राहणारी एक महिला आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पायी चालत थेट वाशी खाडीपुलावर आली. त्यावेळी त्या ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रोहन बागडे, पोलीस हवालदार शिवाजी बसरे, तांबे, दांडेकर आदी डय़ुटीवर होते. या ठिकाणी पोहचलेली ही महिला पुलाचा कठडा ओलांडून पलिकाडील बाजुला गेली आणि पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न करू लागली. हा प्रकार बागडे आणि त्यांच्या सहकाऱयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तिला उडी न टाकण्याची विनंती केली. बागडे यांनी तिला बोलण्यामध्ये गुंतविले, तिचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर बसरे आणि त्यांच्या अन्य सहकाऱयांनी स्वताचा जिव धोक्यात घालून या महिलेवर झडप घातली आणि तिला वाचविले.