शनिवारी माहीममध्ये ‘साहेब चषक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना माहीम विभाग आणि श्री समर्थ सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना खासदार राहुल शेवाळे व आमदार सदा सरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या शनिवारी सायं. 7 वाजता माहीममध्ये 11 वी ‘साहेब चषक 2020’ राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा लोकमान्य विद्यामंदिर शाळा, र. म. गवंडे उद्यान, भंडार गल्ली, माहीम येथे आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण 5 लाख रुपये रकमेची पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेला खासदार राहुल शेवाळे, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री ऍड. अनिल परब, विभागप्रमुख आमदार सदा सरवणकर, मनपा सभागृह नेत्या विशाखा राऊत, माहीम विधानसभा संघटक राजू पाटणकर, विभाग संघटक शशी फडते हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचे माध्यम प्रायोजक ‘दैनिक सामना’ आहे.