मुंबईत थंडी पडली, ट्विटरवर मीमची शेकोटी; #mumbaiwinter ट्रेंडिग टॉपिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ice-man

एरवी घामाच्या धारांनी जीव नकोसा करून टाकलायं असं म्हणणाऱ्या मुंबईकरांना सध्या ‘सो कूलsss!’ असं म्हणण्याची वेळी आली आहे. कधी नव्हे ते स्वेटर, मफ्लर, जॅकेट्स घालून मुंबईकर बाहेर पडताना दिसत आहे. अशी थंडी अनुभवण्यासाठी मुंबईकर अनेकदा महाबळेश्वर, माथेरान गाठतात. मात्र आता मुंबईतच गारेगार वातावरण अनुभवायला मिळत असल्याने मुंबईच महाबळेश्वर-माथेरान झाल्या सारखं वाटत असून सोशल मीडियावर देखील त्याची चर्चा रंगली आहे. ट्विटरवर तर #mumbaiwinter ट्रेंडिंग टॉपिक ठरला आहे.

मुंबईकरांनी थंडीचे हे अनुभव गमतीशीररित्या #mumbaiwinter सह ट्विट केले आहेत. एका युझरने गोलमालमधील अर्शद वारसीच्या डायलॉगचा आधार घेत मुंबईच्या थंडीवर मीम बनवला आहे.

कार्तिक नावाच्या एका युझरने आपल्या घरातील बंद पंख्याचा फोटो काढू अन्य कुणी कुणी आपल्या घरातील पंखे असे बंद ठेवले आहेत का? असा प्रश्न विचारला आहे.

तर एका युझरने मिसळ पावचा फोटो टाकून गरमागरम नाश्त्याचा आनंद लुटत असल्याचं म्हटलं आहे.

प्रिया फ्लॉरेन्स शहा या ऑनलाईन ब्रँडिंग कनस्लटंट यांनी पुणेकरांची बाजू घेत मुंबईकरांना चिडवण्याचा प्रयत्न केला आहे.

भूषण नावाच्या एका युझने चादरीत गुंढाळलेल्या मांजरीच्या पिलांचे अत्यंत गोंडस gif ट्वीट केलं आहे.

दरम्यान, गुरुवार पाठोपाठ शुक्रवारची पहाटही मुंबईकरांसाठी विशेष ठरली आहे. कुडकुडतच मुंबईकरांच्या दिवसाला सुरुवात झाली. काही भागात शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळाल्या.

गुरुवारी कुडकुडतच अंथरुणातून बाहेर पडलेले मुंबईकर दुपारी आणि सायंकाळीही थंड वाऱ्यांमुळे गारठून गेले होते. मुंबईच्या पाऱ्याने यंदाच्या हिवाळय़ात पहिल्यांदाच गुरुवारी 14 अंशांची नीचांकी पातळी गाठली. बोरिवलीत तर सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमान 12 अंशांवर घसरले. हे किमान तापमान गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी असल्याचे हवामान खात्याने सांगितले. पुढले दोन दिवस तापमान 10 ते 12 अंशांवर घसरू शकते, असा अंदाजही वतर्वण्यात आला आहे.