
>> शैलेश माळोदे
प्रा. एम. विजयन. आपल्या देशातील जैव–तंत्रज्ञानात यांची महत्त्वाची भूमिका आहे.
माझा जन्म केरळमधील चेरपू या गावी झाला. कोणीही मला प्रश्न विचारला की तुमचं करिअर वैज्ञानिक म्हणून काय होतं? तर त्याचं साधं सोपं उत्तर म्हणजे मी ‘स्ट्रक्चरल बायोलॉजिस्ट’ असून माझं प्रमुख संशोधन प्रथिनांच्या संरचनेबाबत आहे. 2005 साली बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेत सेंटर फॉर कॉन्टेम्पररी स्टडीजमध्ये व्हिजिटिंग सायंटिस्ट म्हणून काम करताना जेव्हा माझी प्रा. एममन्नामना विजयन अर्थात प्रा. एम. विजयन यांच्याशी भेट झाली तेव्हा स्वतःची ओळख त्यांनी अशाप्रकारे करून दिली होती. लेक्टिन आणि प्रोटिन (प्रथिने) यांच्या हायड्रेशनविषयी त्यांचं प्रमुख योगदान असून त्यांनी जीवनाच्या सुरुवातीविषयी विशेषतः त्याच्या रासायनिक उक्रांतीसंबंधी प्रामुख्याने कार्य केलंय. हिंदुस्थानमध्ये ‘मॅक्रोमॉलिक्युलर क्रिस्टलोग्राफी’ तंत्र जैविक बाबतीत वापरून संशोधन करणारे प्रा. विजयन हे प्रमुख.
2004 साली त्यांना राष्ट्रपतींनी पद्मश्री प्रदान केली असून ते या काळात भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष होते. सध्या ते भारतीय विज्ञान संस्था बंगळुरूमध्ये मनद डीएई होमी भाभा प्राध्यापक आहेत. अलाहाबाद विद्यापीठातून एम.एस्सी. पदवी प्राप्त केल्यावर मी ‘क्ष-किरण क्रिस्टलोग्राफी’मध्ये डॉ. एम. ए. विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आय.आय.एस्सी बंगळुरूमधून पीएच.डी. मिळवली. मी प्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रा. डोरोथी, हॉजकिन्स याच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधन गटात पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून काम केले. त्यावेळी मी इन्शुलिन स्फटिकांच्या एक्स-रे विचरण (डिफ्रॅक्शन) डेटाचा मी अभ्यास केला असं सांगून प्रा. एम. विजयन यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील धांडोळा घेतला. 1971 साली ते हिंदुस्थानात परतले आणि त्यांनी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स (भारतीय विज्ञान संस्था) बंगळुरूमध्ये रेणवीय जैवभौतिकी विभागात संशोधनास सुरुवात केली. याच गटात त्यांनी विविध पदांवर काम केलं. प्राध्यापक, गटाचे मध्य आणि संस्थेच्या जैवविज्ञान गटाचे प्रमुख इत्यादी पदं त्यांनी भूषविली. या काळात ते आयआयएस्सीचे सहयोगी संचालक होते. त्यानंतरदेखील त्यांनी संस्थेत प्रथम जैव तंत्रज्ञान विभागाचे विशेषतः वैज्ञानिक आणि त्यानंतर त्यांनी डीएई होमी भाभा प्राध्यापक (मानद) म्हणूनही आपलं काम सुरू ठेवलंय. 79 व्या वर्षातदेखील ते कार्यरत असून बंगळुरूत स्थायिक आहेत.
रासायनिक उक्रांती आणि जीवनाच्या सुरुवातीसंबंधीचं ज्ञान प्राप्त होणं अधिक सुकर झालं. विविध सूक्ष्म परोपजीवींच्या रचनांबाबतचा एक राष्ट्रीय जीवशास्त्रीय कार्यक्रम त्यांनी सुरू केला. अनुवंशिकीशास्त्राची जडणघडण क्षयरोगाच्या अधिक माहितीसाठी करून त्यांनी जीवशास्त्राला असलेला रेणवीय पाया खूपच मजबूत केला. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संघटनांच्या कार्यातदेखील प्रा. विजयन यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलीय. क्रिस्टलोग्राफी विषयक आंतरराष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषद, आंतर अकादमी पॅनल आणि आंतर अकादमी परिषद इत्यादी संस्थांचे ते सदस्य असून हिंदुस्थान सरकारच्या विविध वैज्ञानिक संस्थाच्या कामात त्यांनी खूप योगदान दिलंय.
प्रा. विजयन अत्यंत शांत व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
प्रा. विजयन अजूनही संशोधनाबरोबरच विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासहित शिकविण्याच्या कामी सतत कार्यरत असतात. बंगळुरू येथील जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्रातदेखील ते 1998 पासून मानद प्राध्यापक म्हणून अध्यापन कार्य करीत आहेत. प्रा. एम. विजयन यांचे अनेक शिष्य देशात आणि परदेशात अनेक महत्त्वाची पदं भूषविण्याबरोबरच संशोधन कार्यात सक्रिय असून याबाबत ते अत्यंत समाधानी आहेत. प्रा. विजयन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पदवी संपादन केलेले डॉ. शेखर मांडे सध्या सीएसआयआरचे महासंचालक असून ते यापूर्वी एनसीसीएस पुणे संस्थेचे संचालक होते.
21 व्या शतकात जैव तंत्रज्ञन महत्त्वाची भूमिका बजावत असून भविष्यातदेखील त्याचं स्थान मजबूत राहणार आहे. तेव्हा हिंदुस्थानी तरुणांना या क्षेत्रात मर्दुमकी दाखविण्याची उत्तम संधी असून राजकारणात अडकून शिक्षणाकडे दुर्लक्ष करण्याऐवजी व्यवस्थित शिक्षण पूर्ण करणे आणि त्यासाठी चांगल्या शैक्षणिक सुविधांची मागणी करणे अधिक महत्त्वाचं राहणार आहे’ असं प्रा. विजयन सुचवितात. आणि यात काय खोटं आहे?























































