प्रवाशाची बॅग चोरणारा अटकेत; रॅकवर ठेवलेल्या बॅगा चोरून व्हायचा पसार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

रॅकवर ठेवलेली प्रवाशाची बॅग चोरणाऱयाला अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली. दत्ताराम जगनाळे असे त्याचे नाव असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

तक्रारदार हा उपनगरात राहत असून तो मंगळवारी लोकलने प्रवास करत होता. प्रवासात त्याची बॅग चोरीला गेली. बॅग चोरीप्रकरणी त्याने अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक भारत चौधरी यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक अर्चना क्षीरसागर यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान एक संशयित अंधेरी स्थानकात फिरत असल्याची खबर क्षीरसागर यांच्या पथकाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी दत्तारामला अटक केली. त्याच्याकडे चोरीची बॅग पोलिसांना सापडली. त्याला न्यायालयाने एक दिवसाची कोठडी सुनावली आहे.