विठ्ठल–रुक्मिणीचा शाही विवाह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आकर्षक फुलांची आरास, जागोजागी काढलेल्या रांगोळय़ा, महिलांची सकाळपासूनच मंदिरात जाण्यासाठी लगबग, तर बरोबर  12 वाजता मंगलाष्टक पूर्ण झाल्यावर अंतरपाट काढताच अक्षतांसह फुलांची उधळण व फटाक्यांची आतषबाजी. हा सर्व थाट होता अवघ्या वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असणाऱया श्री विठ्ठल व रुक्मिणीच्या विवाहसोहळय़ाचा. यासाठी गुरुवारी पंढरीत हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. सायंकाळी पाच वाजता रुक्मिणी-पांडुरंगाच्या मूर्ती सजविलेल्या रथात ठेवून मिरवणूकदेखील काढण्यात आली.