क्रीडाप्रेमींना पर्वणी, दोन दिवसात दोन सुपर ओव्हर; टीम इंडिया विजयी, न्यूझीलंड पुन्हा पराभूत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हॅमिल्टनच्या मैदानावर टीम इंडिया आणि न्यूझीलंड संघात सलग दुसरा सामना टाय झाला आणि क्रीडाप्रेमींनी दोन दिवसात दोन सुपर ओव्हरचे सामने पाहण्याची संधी मिळाली. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने 13 धावा करत टीम इंडियापुढे विजयासाठी 14 धावांचे आव्हान ठेवले. टीम इंडियाने हे आव्हान आरामात पार करत विजयी घोडदौड कामय राखली. या विजयासह टीम इंडियाने पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली आहे.

शुक्रवारी झालेल्या लढतीत नियमीत कर्णधार केन विलियन्सन खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे न्यूझीलंडची कमान टीम साऊदीकडे देण्यात आली. साऊदीने नाणेफेक जिंकत टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. टीम इंडियाने मनिष पांडेच्या नाबाद 50 धावा आणि लोकेश राहुलने केलेल्या 39 धावांच्या खेळीमुळे 20 षटकात 8 बाद 165 धावा केल्या.

#INDvsNZ बीसीसीआयने ट्वीट केला भावूक फोटो, नेटकऱ्यांचे डोळे पाणावले

टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 166 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. मार्टिन गप्टील 4 धावांवर बाद झाला. त्यानंतर कॉलिन मुन्रो (64) आणि टीम सैफर्ट (57) यांनी दमदार फलंदाजी करत न्यूझीलंडला विजयाच्या ट्रॅकवर आणले. मात्र मुन्रो बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा डाव पुन्हा कोसळला.

अखेरच्या दोन षटकांमध्ये न्यूझीलंडला विजयासाठी 11 धावांची आवश्यकता होती. 19 व्या षटकात सैनीने अवघ्या चार धावा दिल्या. अखेरच्या षटकात न्यूझीलंडला 7 धावांची आवश्यकता असताना शार्दुल ठाकूरने फक्त 6 धावा देत सामना बरोबरीत सोडवला.