
कराडमधील कृष्णा कारखान्यातील कामगारांच्या प्रश्नांबाबत संचालक मंडळ नेहमीच सकारात्मक आहे. सत्तेवर आल्याबरोबर कामगारांना टप्प्याटप्याने पगारवाढ देण्याबरोबरच उत्कृष्ट सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लवकरच कामगारांना चांगली पगारवाढ दिली जाणार असून, कारखान्याचा एकाही कामगाराला 10 हजार रूपयांपेक्षा कमी पगार मिळणार नाही, अशी घोषणा कारख्यान्याचेचेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केली.
राजारामबापू पाटील दूध संघाचे संचालक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उत्पादित झालेल्या 6 लाख 35 हजाराव्या साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, सांगली जि.प.चे माजी उपाध्यक्ष रणजीत पाटील, अॅड. बी. डी. पाटील, लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, धोंडिराम जाधव, गुणवंत पाटील, गिरीश पाटील, पांडुरंग होनमाने, अमोल गुरव, दिलीप पाटील, जयवंत जगताप उपस्थित होते. सुरवातीला सर्व कामगारांच्या पगारात 900 रूपयांची तर नोव्हेंबर 2016 मध्ये 800 ते 2000 रूपयांची वाढ केली. संचालक मंडळाची मुदत संपण्याअगोदर एकही कामगार 10 हजार रूपये पगाराच्या खाली राहणार नाही, अशी ग्वाही डॉ. भोसले यांनी दिली.






























































