जामियाप्रकरणी पोलीस उपायुक्तांची बदली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जामिया मिलिया इस्लामिया आणि शाहीन बाग परिसरात आठवडय़ाभरात दुसऱ्यांदा गोळीबाराची घटना घडल्याने या घटनेची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

आयोगाने दक्षिण-पूर्व दिल्लीचे पोलीस उपायुक्त चिन्मय बिस्वाल यांच्या बदलीचे आदेश दिले असून त्यांच्या जागी नव्या पोलीस उपायुक्तांच्या नावाची घोषणाही करण्यात आली आहे. चिन्मय बिस्वाल यांची तात्काळ प्रभावाने बदली करण्यात येत असल्याचे आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे. बिस्वाल यांच्या जागी दक्षिण पूर्वचे नवे पोलीस उपायुक्त म्हणून कुमार ज्ञानेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे.