
कांदिवली प्रभाग क्र. 28 मधील काँग्रेसचे नगरसेवक राजपती यादव यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्याच्या निर्णयावर आज लघुवाद न्यायालयानेही शिक्कामोर्तब केल्यामुळे या निवडणुकीत दुसऱया क्रमाकांवर असणारे शिवसेना उमेदवार एकनाथ (शंकर) हुंडारे यांचा नगरसेवक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत 4 फेब्रुवारी रोजी पालिका सभागृहात घोषणा होणार असून शिवसेनेचे संख्याबळ 96 होणार आहे.
पालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसचे राजपती यादव हे निवडून आले होते. मात्र त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार शिवसेनेचे शंकर हुंडारे यांनी जात पडताळणी समितीकडे केली होती. या पार्श्वभूमीवर केलेल्या तपासणीत यादव यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय 5 एप्रिल 2019 रोजी जात पडताळणी समितीने दिला होता. या पार्श्वभूमीवर तत्कालीन महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी एप्रिल 2019 मध्ये यादव यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याची घोषणा महासभेत केली होती. मात्र या निर्णयाविरोधात यादव यांनी आधी उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातही जात पडताळणी समितीच्या निर्णयाला आव्हान दिले होते. मात्र दोन्ही न्यायालयांनी यादव यांची याचिका फेटाळून लावल्यामुळे आज लघुवाद न्यायालयानेही शिवसेनेच्या शंकर हुंडारे यांनाच नगरसेवक म्हणून घोषित केले.
पक्षीय बलाबल
शिवसेना – 96
भाजप – 83
काँग्रेस – 29
राष्ट्रवादी – 8
सपा – 6
मनसे – 1
एमआयएम – 2
दोन नगरसेवक प्रकरणे न्यायालयात























































