शिवसेनेच्या वतीने राज्यस्तरीय वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने वरोरा येथील गांधी चौकात राज्यस्तरीय खुल्या वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन शनिवारला करण्यात आलेले आहे. दिनांक आठ फेब्रुवारी ला आयोजित वाद व स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांच्या हस्ते करण्यात येणार असून डॉ. ब्रह्मदत्त पांडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.

आनंदनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे आणि जिल्हा शिवसेना प्रमुख नितीन मत्ते हे या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या 30 स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार असून प्रथम पारितोषिक रुपये 7001, द्वितीय 5001, तृतीय 3001, चतुर्थ 2001 तसेच पाचव्या सहाव्या व सातव्या येणाऱ्या स्पर्धकास प्रत्येकी रुपये 1000 उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार आहे.

स्पर्धेचा विषय ‘मागील पाच वर्षांत भारताचा विकास की भकास’ असा असून स्पर्धा सकाळी 11 वाजता सुरू होईल. याकरिता अधिक माहितीकरता इच्छुकांनी नितीन मते (9518997375) डॉ प्रशांत खुळे (9822765972) संदीप मेश्राम (9552037071) तसेच मुकेश जीवतोडे (9923455629) या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी केलं आहे.