
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीपासूनच काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. जर आमचं सरकार मागच्या सरकारच्या मार्गावर चाललं असतं तर जम्मू-कश्मीरमधून 370 हटले नसते, तिहेरी तलाक संपला नसता, चीफ ऑफ डिफेंस स्टॉफ नियुक्ती झाली नसती, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
संविधानाच्या नावाखाली काय सुरू आहे ते आम्ही पाहात आहोत, असे मोदी म्हणाले. आमच्यावर टीका करणाऱ्यांनी, संविधान वाचवा म्हणणाऱ्यांनी विचार करावा की आणीबाणी कुणी आणली? संविधानात सर्वाधिक दुरुस्त्या कुणी केल्या? मंत्रिमंडळाचे निर्णय फाडून फेकणारे आमच्यावर संविधान वाचवा म्हणत टीका करत आहेत.
- CAA मुळे हिंदुस्थानातील कोणत्याही नागरिकावर त्याचा परिणाम होणार नाही. तो हिंदू असो किंवा मुसलमान कुणालाही धक्का लागणार नाही. असे असताना देखील ज्यांना देशाच्या जनतेने नाकारलं आहे, तेच केवळ वोटबँकेचे राजकारण करत आहेत – पंतप्रधान मोदी
- पंतप्रधान म्हणाले की, कुणाला पंतप्रधान बनायचे होते त्यासाठी हिंदुस्थानात रेषा आखून देशाची फाळणी करण्यात आली.
- काँग्रेससाठी जे ‘मुसलमान’ आहेत, आमच्यासाठी ते हिंदुस्थानी – पंतप्रधान मोदीकाही लोक म्हणतात की CAA इतक्या लवकर का आणलं? काही म्हणतात की आम्ही हिंदू-मुसलमानांमध्ये भेद करत आहोत. अशी भाषा जे करतात ते पाकिस्तानची भाषा बोलत आहे, असं मोदी म्हणाले. विरोधक मुसलमानांना चुकीची माहिती देत असल्याचे म्हणत जे काँग्रेससाठी मुसलमान आहेत ते आमच्यासाठी हिंदुस्थानी आहेत, असंही मोदी म्हणाले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनाचे नाव न घेता या आंदोलनाला कुणाचे समर्थन आहे हे सर्वांना माहीत आहे असं म्हणताना पुढील ओळी उद्धृत केल्या.ख़ूब पर्दा है, कि चिलमन से लगे बैठे हैं.साफ़ छुपते भी नहीं, सामने आते भी नहीं!!
ये पब्लिक सब जानती है. समझती है.
- सूर्यनमस्कारांची संख्या वाढवेन, राहुल गांधींच्या टीकेवर उत्तर –पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. प्रचारसभेत मोदींना लक्ष्य करताना राहुल गांधी म्हणाले होते की 6 महिन्यांनंतर देशातील युवक मोदींना दांडुक्याने मारतील. त्यावर मोदी म्हणाले मी सूर्यनमस्काराची संख्या वाढवेन ज्यामुळे माझे शरीर पुष्ट होऊन मार झेलण्यासाठी तयार होईल. मला 20 वर्षांपासून शिव्या ऐकण्याची सवय आहे, असेही ते म्हणाले.
- आमचं सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरलं – मोदी
- विरोधकांना मी टीकाकार नाही, तर मागर्दशक मानतो
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना विरोधकांना चिमटा घेताल. ‘विरोधक जेव्हा मला काम का झाले नाही असे विचारतात, माझ्यावर टीका करतात, तर मी त्यांना टीकाकार मानत नाही तर मार्गदर्शक मानतो. कारण त्यांना विरोधकांना विश्वास आहे की, करेल तर हाच करेल’, असं मोदी म्हणाले. तसेच मी सर्व कामे करेन पण एक काम करणार नाही, ते म्हणजे विरोधकांची बेरोजगारी कमी करणार नाही.
- ‘बोडोलॅण्ड’ संदर्भात जानेवारीच्या 27 तारखेला करण्यात आलेल्या त्रिपक्षीय करारामुळे आसाममध्ये शांती प्रस्थापित होत असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. बोडो आंदोलकांचा सशस्त्र गट देखील आता हिंदु्स्थान सरकारच्या सोबत आला आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आता बोडो समाजाच्या कोणत्याही मागण्या शिल्लक राहिल्या नाहीत असाही दावा त्यांनी यावेळी केला.
- गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारने वेगानं काम करत अनेक कामं पूर्ण केली, त्यामुळेच आम्हाला जनतेने अधिक सेवा करण्याची संधी दिली – पंतप्रधान मोदी
- काँग्रेसच्या मार्गावर चाललो असतो तर…
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीपासूनच काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. देशात केवळ सरकार बदलले नाही तर ‘सरोकार’ देखील बदलले आहे. जर आमचं सरकार मागच्या सरकारच्या मार्गावर चाललं असतं तर जम्मू-कश्मीरमधून 370 हटले नसते, तिहेरी तलाक संपला नसता, चीफ ऑफ डिफेंस स्टॉफ नियुक्ती झाली नसती, आम्ही लीकपासून वेगळा आमच्या रस्त्याने चालतो.
- लीक पर वे चलें जिनके चरण दुर्बल और हारे हैं।-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत कवि सर्वेश्वर दयाल सक्सेना यांच्या कवितेतील काही चरण वाचून दाखवले.
- ‘लीक पर वे चलें जिनके चरण दुर्बल और हारे हैं. हमें तो जो हमारी यात्रा से बने, ऐसे अनिर्मित पथ ही प्यारे हैं’
- गांधी आमच्यासाठी जीवन- मोदी
- लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणासाठी उभे राहिले तेव्हा भाजपच्या नेत्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. यावेळी विरोधी पक्षातील सदस्यांनी महात्मा गांधी यांचा विजय असो अशा घोषणा दिल्या. यानंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले हा तर केवळ ट्रेलर होता. यावर मोदी म्हणाले की गांधी तुमच्यासाठी ट्रेलर असतील, आमच्यासाठी जीवन आहेत.
- विरोधी पक्ष काँग्रेसला केले लक्ष्य
- राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे भाषण
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभते भाषण सुरू






















































