अरे बापरे..! कोरोना व्हायरसमुळे 25 हजार लोकांचा मृत्यू, चिनी कंपनीचा डेटा झाला लीक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

चीनमधील कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट संपूर्ण जगावर घोंगावत असताना याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनमध्ये या व्हायरसमुळे तब्बल 25 हजार लोकांचा मृत्यू झाला असून दीड लाखांपेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे. चीनच्या एका प्रमुख कंपनीचा डेटा लीक झाल्यामुळे ही भयानक आकडेवारी समोर आली आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया‘ने दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी टेनसेन्ट (Tencent) या कंपनीचा डेटा लीक झाला आहे. लिक झालेल्या डेटातील आकडेवारीनुसार चीनमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 25 हजारपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत. परंतु चिनी सरकारने मात्र आतापर्यंत फक्त 563 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.

‘तैवान न्यूज’च्या (Taiwan News) वृत्तानुसार, चीनी कंपनी टेनसेन्टचा हा डेटा एका चुकीमुळे लीक झाला आहे. कंपनीच्या डेटानुसार चीनमध्ये आतापर्यंत 1,54,023 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून जवळपास 25 हजार लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. हा डेटा लीक झाल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर यावरून वाद निर्माण झाल्यानंतर कंपनीने जुना डेटा हटवला असून नवीन आकडेवारी जाहीर केली आहे. या कंपनीने कोरोना व्हायरसमुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा 304 असा दाखवला आहे, तर 14,446 जणांना याची लागण झाल्याचे नमूद केले आहे.

चिनी सरकारवर माहिती लपवल्याचा आरोप
टेनसेन्ट कंपनी आणि चिनी सरकारने जारी केलेल्या कोरोना व्हायरसमुळे मृत्यू पावलेल्या लोकांच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत दिसून आल्याने खळबळ उडाली. सरकार खरी माहिती लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप चीन कम्युनिस्ट पार्टीने केला आहे.

‘या’ देशांमध्येही कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले
कोरोना व्हायरस चीनसह संपूर्ण जगामध्ये पसरला आहे. चीन, हिंदुस्थानसह अनेक देशांमध्ये याचे रुग्ण आढळून आले असून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने वैद्यकीय (आरोग्य) आणीबाणीही जाहीर केली आहे. आतापर्यंत कोणत्या देशात किती रुग्ण आढळले पाहूया याबाबतची आकडेवारी.

चीन – 14,446 (सरकारी आकडा)
हिंदुस्थान – 3
जपान – 34
सिंगापूर – 24
थायलंड – 25
दक्षिण कोरिया – 19
जर्मनी – 12
ऑस्ट्रेलिया – 14
अमेरिका – 11
तैवान – 11
मलेशिया – 10
व्हीएतनाम – 10
फ्रान्स – 6
युएई – 5
कॅनडा – 4
फिलिपिन्स – 3 (एकाचा मृत्यू)
रशिया, इटली, ब्रिटन, बेल्झीयम आणि नेपाळ – 2
श्रीलंका आणि फिनलँड – 1