
ब्रेकअप केले म्हणून रागावलेल्या प्रियकराने प्रेयसीला भोसकले आहे. नंतर कॉलेजच्या तिसर्या मजल्यावरून उडी मारली आहे. यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
MP: A student of Seva Sadan College, Burhanpur stabbed a girl student&jumped off the 3rd floor of the college building after stabbing himself,y’day. Both were admitted to a hospital. Police say “We’re investigating. Spot&CCTV footage being examined. One team visited the hospital” pic.twitter.com/TPJBg6fup8
— ANI (@ANI) February 7, 2020
मध्य प्रदेशमधील बुर्हाणपूरची ही घटना आहे. एका महाविद्यालयातील एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचे प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी दोघांचे ब्रेकअप झाले. नंतर विद्यार्थ्याने विद्यार्थिनीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. शुक्रवारी दोघे कॉलेजमध्ये पोहोचले. बोलण्यासाठी विद्यार्थ्यांनी तिला तिसर्या मजल्यावर नेले. दोघांमध्ये वाद झाला आणि विद्यार्थ्याने विद्यार्थिनीला चाकूने भोसकले. आपण पकडले जाऊ या भितीने विद्यार्थ्याने तिथूनच उडी मारली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून दोघांवर उपचार सुरू आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.




























































