
आयटी क्षेत्रात करीअर करू इच्छिणाऱया विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हिंदुस्थानातील आघाडीची कार कंपनी होंडा कार्स इंडिया लिमिटेडने 14 आयआयटीयन्सना शिष्यवृत्ती दिली आहे. यामध्ये आयआयटी मुंबईच्या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कुमार शिवम, उद्धव अगरवाल, चेरुब कपून अशी तिघांची नावे आहेत. ही यंग इंजिनियर अँड सायंटिस्ट पुरस्काराअंतर्गत प्रत्येकाला तीन हजार अमेरिकन डॉलर्सची शिष्यवृत्ती आहे. त्यासाठी सहा आयआयटींमधून 495 हून अधिक अर्ज आले होते. होंडा कंपनीने आतापर्यंत गेल्या 13 वर्षांत 168 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सन्मानित केले आहे.

























































