विजेच्या तारांच्या संपर्कात आली बस, सहा प्रवाशांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओडिशामध्ये एका बसला भीषण अपघात झाला आहे. बस विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 40 प्रवासी जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जंगलपाडू ते चिकरादा दरम्यान जाणारी बस 11 किलो वॅट विजेच्या तारांच्या संपर्कात आली. त्यामुळे बसला आग लागली. त्यामुळे सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. सर्व लोक जवळच्या गावातील साखरपुड्यासाठी आले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी बचाव कार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या अपघात 40 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.