बीडमध्ये रंगणार पहिले ‘वृक्षसंमेलन’, अभिनेते सयाजी शिंदे, धनंजय मुंडेसह मान्यवर लावणार हजेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांची संकल्पना आणि वन विभागाच्या सहकार्याने पालवनच्या उजाळ माळराणावर फुललेल्या सह्याद्री देवराई प्रकल्पावर जगातील पहिले वृक्ष संमेलन 13 व 14 फेब्रुवारी 2020 रोजी होत आहे. पर्यावरण आणि निसर्गप्रेमी असेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत हे संमेलन होत असून पालकमंत्री धनंजय मुंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पर्यावरण प्रेमींसाठी अनोखी मेजवाणी असलेल्या या वृक्ष संमेलनास विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींनी मोठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सयाजी शिंदे, लेखक अरविंद जगताप, कृषीभूषण शिवराम घोडके यांनी केले आहे.

सह्याद्री देवराई व वनविभाग बीड यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या जगातील पहिल्या वृक्ष संमेलनात मान्यवरांचे वृक्ष, वनस्पती, वन्यजीव यांच्यावर व्याख्याने होणार आहेत. 13 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 11:30 श्रीकांत इंगनहलीकर यांचे ‘ दुर्मिळ वनस्पती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. 12:05 वाजता सी. बी. साळुंके हे ‘गवताळ परिसंस्था’ परिसंस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 12:05 वाजता बसवंत दुमने यांचे ‘पर्यावरन खेळ’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी 01: 15 वाजता नंदु तांबे हे ‘पक्षी झाडे सहसबंध’ या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. 01: 50 वाजता दिनकर चौगुले हे ‘देवराई यशोगाथा’ या विषयावर बोलणार आहेत. 02 :15 वाजता महेंद्र चौधरी ‘सुगंधी वनस्पतीची लागवड व तेल निर्मिती’ या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. 03: वाजता पांडूरंग शितोळे हे शेद्रीय शेती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तर 03:35 वाजता शेखर गायकवाड हे ‘झाडे लागवड व देवराई निर्मिती यशोगाथा’ यावर बोलणार आहेत. सायंकाळी 04:10 वाजता पोपट रसाळ हे वृक्ष बँकेची संकल्पना मांडणार आहेत.

14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता संजय नरवटे हे पीक व झाडांवरील रोग- किड व्यवस्थापन या विषयावर बोलणार आहेत. 11: 05 वाजता जयसिंग पवार हे पाणी व्यवस्थापन या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत. यानंतर सुहास वाईंगनकर हे ‘दुर्मिळ फुपाखरू’ या विषवर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 12:15 वाजता वृक्ष संवर्धनात महिलांचा सहभाग या विषयावर सुनंदाताई पवार या आपले विचार व्यक्त करणार आहेत. 02 वाजता रघुनाथ ढोले हे रोपवाटीका या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. पालवन येथील देवराई प्रकल्पावर दोन दिवस रंगणारे हे वृक्ष संमेलन विद्यार्थी आणि निसर्गप्रेमी नागरीकांसाठी एक अनोखी मेजवाणी असणार आहे. अशा अनोख्या आणि जगातील पहिल्या वृक्ष संमेलनास विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सयाजी शिंदे, लेखक अरविंद जगताप, कृषीभूषण शिवराम घोडके व वन विभाग बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सुनंदाताई पवार यांचे व्याख्यान
वृक्ष संमेलनात 14 फेब्रवारी रोजी दुपारी 12 :05 वाजता आमदार रोहीत पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार ह्या ‘वृक्ष संमेलनात महिलांचा सहभाग’ या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. सुनंदाताई पवार यांचे निसर्ग आणि पर्यावर या क्षेत्रात मोठे काम असून बारामती परिसरात त्यांनी शेती आणि मातीवर मोठे काम केले आहे. त्यांचे व्याख्यान एक मेजवानी असणार आहे. पालवन येथे होणार्‍या वृक्ष संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संमेलनाचे संयोजक तथा कृषी भूषण शिवराम घोडके हे विशेष प्रयत्न करत आहेत.