पर्यावरणाचा संदेश देणारा सायकल क्लब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शारीरिक तंदुरुस्तीसाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी सायकल चालवण्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विवेकानंद सायकल क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या क्लबच्या वतीने सुरुवातीला दर रविवारी आरेच्या जंगलात सायकल सफर आयोजित करण्यात येत आहे.

युवकांनी आठवडय़ातून एकदा सायकलचा वापर करावा आणि पेट्रोलचा वापर टाळावा, हा संदेश विवेकानंद सायकल क्लबमार्फत देण्यात येत आहे. यासाठी तरुणांना सायकलींचे वाटप करण्यात येत आहे. रवींद्र जोशी मेडिकल फाऊंडेशन आणि आमदार ऍड. आशीष शेलार यांच्या संयुक्त विद्यमाने संतोष केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच 30 सायकलींचे आणि व्यायामाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर या युवकांनी आरे जंगलची सायकल सफर केली. दर रविवारी आरे येथे गेल्यानंतर युवकांना इतिहासाच्या पुस्तकातील प्रकरणाचे वाचन करून दाखवण्याचा उपक्रमही सुरू करण्यात येणार आहे.