
शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी भाषा दिवस आणि शिवराय संचलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासंदर्भात महासंघाशी संलग्न समित्यांची बैठक गुरुवार 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता दादरच्या शिवसेना भवन येथे होणार आहे.
लोकाधिकार महासंघाच्या वतीने मराठी भाषा दिवस आणि शिवराय संचलनाचे आयोजन 27 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, शिवसेना नेते व महासंघाचे कार्याध्यक्ष आनंदराव अडसूळ तसेच महासंघाचे सरचिटणीस, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई हे मार्गदर्शन करणार आहेत. महासंघाशी संलग्न सर्व समित्यांचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन महासंघाचे चिटणीस वामन भोसले यांनी केले आहे.

































































