मानसोपचारतज्ज्ञाचा तरुणीवर तीनदा बलात्कार, पोलिसांकडून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिथिक फोटो

बोरिवलीतील एका मानसोपचारतज्ज्ञाने 19 वर्षीय तरुणीवर तीन वेळा बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

जुलै 2018 मध्ये एक तरुणी उपचारासाठी डॉ. संजोय मुखर्जी यांच्याकडे गेली होती. तेव्हा डॉक्टरने उपचाराच्या नावाखाली तिच्यावर बलात्कार केला. तसेच या घटनेचा व्हिडीओही चित्रित केला. हा व्हिडीओ दाखवून डॉक्टरने पीडित तरुणीला ब्लॅकमेल  केले आणि पुन्हा तिच्यावर दोनदा बलात्कार केला. नंतर तरुणीने दुसर्‍या मानसोपचारतज्ज्ञाकडे धाव घेतली. तेव्हा तिने सर्व हकीगत डॉक्टरला सांगितली. ही बाब तु आपल्या पालकांना सांगावी असे डॉक्टरांनी तिला सांगितले. पालकांना ही बाब कळाल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेतली व आरोपी डॉक्टरच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कारवाई करत डॉ. मुखर्जीला अटक केली आहे.