
दिल्लीच्या गार्गी कॉलेजमध्ये घुसून काहींनी विद्यार्थिनींनीची छेड काढली होती. तसेच अश्लील इशारे आणि हस्तमैथूनही केले होते. या प्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटक केली होती. न्यायालयाने सर्व दोषींना जामीन मंजूर केला आहे.
Delhi: Saket court grants bail to 10 people, who were arrested in connection with the alleged molestation of students during a cultural festival at #GargiCollege, on a bail amount of Rs 10,000 each. Earlier, they were sent to judicial custody by the court.
— ANI (@ANI) February 14, 2020
दिल्लीच्या गार्गी कॉलेजमध्ये 6 फेब्रुवारी रोजी कॉलेज फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिवलमध्ये घुसून 10 जणांनी हैदोस घातला होता. अनेक तरुणींची छेड काढत त्यांना अश्लील इशारे केले होते. तर काही नराधमांनी मुलींच्या समोरच हस्तमैथून केले होते. या प्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटक केले आहे. आज दिल्लीच्या साकेत न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल आहे सर्व आरोपींना 10 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.



























































