
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजपला सणसणीत पराभवाचा धक्का दिल्यानंतर ‘आम आदमी पार्टी’चे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपाळ राय यांनी शुक्रवारी सांगितले.
‘आप’चे संयोजक गोपाळ राय यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींना शुक्रवारी सकाळीच निमंत्रणाचे पत्र पाठवण्यात आले आहे. केजरीवालांच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा येत्या रविवारी 16 फेब्रुवारीला येथील रामलीला मैदानात होणार आहे. निमंत्रण पाठवण्यात आले असले तरी मोदी या सोहळ्याला उपस्थित राहतील का याबाबत शंका आहे. कारण रविवारीच ते 30हून अधिक प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी वाराणसीला जाणार आहेत.



























































