2024 पूर्वी पुन्हा पुलवामा हल्ला होईल, काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2024 पूर्वी पुन्हा पुलवामासारखा हल्ला होऊ शकतो असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस नेते उदित राज यांनी केले आहे. पुलवामा हल्ल्याबाबत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला काही प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांमध्ये तथ्य असल्याचे सांगत उदित राज यांनी या हल्ल्याची योग्य चौकशी व्हायला हवी. ‘जे लोक सत्ता मिळवण्यासाठी गुजरातमध्ये नरसंहार करू शकतात ते सत्ता टिकवण्यासाठी 40 जवानांच्या जीवाचा सौदाही करू शकतात. या लोकांसाठी देशभक्ती आणि राष्ट्रवाद म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याची साधने आहेत’ असे त्यांनी म्हटले आहे.