सोनम कपूर मांसाहार करणारी मूर्ख बाई, पायल रोहतगीचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारी एकदा तुरुंगाची हवाही चाखलेली अभिनेत्री पायल रोहतगीने पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. पायल रोहतगी हिने बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिच्यावर हल्लाबोल केला आहे. पेटाच्या एका ट्वीटला सोनम कपूरने उत्तर दिले आणि यावरून पायलने तिला ट्रोल केले.

प्राण्याची काळजी घेणारी संस्था पेटाने (People for the Ethical Treatment of Animals) एक ट्वीट केले असून यात त्यांनी बॉलिवूडमधील कारी सेलिब्रिटिंना टॅग केले आहे. लग्नामध्ये नवरदेवाला घोडीवर बसवून मिरवण्याची प्रथा असून याच संबंधी पेटाने ट्वीट करून यावेळी त्या मुक्या जनावराला किती त्रास होतो हे सांगितले.

पेटाच्या उत्तर देताना अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने माझे आणि अली फजलच्या लग्नाच्या वार्ता सध्या आहेत. मात्र लग्नामध्ये मी हे असे करणार नाही, असे वचन देते असे म्हटले आहे. तसेच सोनम कपूर हिने माझ्या पतीने याचमुळे लग्नात घोडी आणि धांगडधिंगा, आवाज करणारे म्यूझिक ठेवले नव्हते, असे उत्तर दिले.

रोहतगीचा संताप
सोनमच्या ट्वीटनंतर पायल रोहतगी हिने संताप व्यक्त केला आहे. राम रामजी, तू एक मांसाहार करणारी मूर्ख बाई आहेत. मांस हे जनावरांची हत्या करूनच मिळते. ते काही शाकाहारी नसते. आशा करते तुला लवकरच बुद्धी येईल, असे ट्वीट पायलने केले आहे.