लिंगायत मठाच्या महंतपदी मुस्लिम व्यक्ती, पीठाधीश्वरकडून नियुक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकमधील एका सुप्रसिद्ध मठात एक मुस्लिम व्यक्ती महंत झाले आहेत. दीवान शरीफ मुल्ला असे या व्यक्तीचे नाव असून मठाच्या पीठाधीश्वरांनी त्यांची नियुक्ती केली आहे.

कर्नाटकमधील लिंगायत मठ आहे. या मठाचे पीठाधीश्वर श्री मुरुगजेंद्र यांनी महंतपदी दीवान शरीफ यांची नियुक्ती केली आहे. यावर शरीफ म्हणाले की, हे इश्वराच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनामुळे मी महंत झालो आहे. मला हे कोणी करायाला सांगितले नाही. हा मझा सन्मान आहे. मला इष्ट लिंग दिले असून मी ते धारण केले आहे. धर्माच्या रस्त्यावर मी पुढे जाईन. मला प्रेम आणि त्यागाचा संदेश द्यायचा असून त्याचाच प्रचार आणि प्रसार करायचा आहे.”

मठाचे पीठाधीश्वर मुरुगजेंद्र कोरानेश्‍वर स्‍वामी म्हणाले की, तुम्ही कुठल्या जाती धर्माचे आहात हे महत्त्वाचे नाही. जर देवाने तुम्हाला सद्भावना आणि त्यागाच्या मार्गाव पाठवले आहे. तर मानवांनी निर्माण केलेले जाती धर्माचे बंधन तुटून जातात. त्यानंतरही तुम्ही देव्हाच्या मार्गावरून पुढे जातात असेही  स्वामी म्हणाले.