चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुविख्यात चंदन तस्कर वीरप्पन याची मुलगी विद्या राणीने शनिवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. तमिळनाडूत भाजपचे राष्ट्रीय महासचिव मुरलीधर राव, माजी केंद्रीय मंत्री पॉन राधाकृष्ण यांच्या उपस्थित विद्या राणीने भाजपचा झेंडा हातात घेतला.

पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व घेतल्यानंतर विद्या राव म्हणाली की, मी गरजू लोकांसाठी काम करेन, माझ्या वडिलांचा मार्ग चुकीचा होता परंतु त्यांनी नेहमीच गरीबांचा विचार केला. विद्या राणी वकील आहे. तिच्यासह हजारो समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. वीरप्पनवर चंदन तस्करी, अपहरण, खंडणीसारखे गंभीर गुन्हे होते. दक्षिण हिंदुस्थानात वीरप्पनचा चांगलाच दरारा होता. 18 ऑक्टोबर 2004 रोजी पोलिसांनी त्याला गोळ्या घालून ठार केले.