दिल्ली हिंसाचार – अग्निशमन दलाच्या जवानाला जाळण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत सोमवारी CAA आणि NRC विरोधात आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यात एका पोलीस शिपायाचा मृत्यू झाला. आंदोलकांनी एका अग्निशमन दलाच्या जवानाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सोमवारी दिल्लीच्या जाफराबादमध्ये हिंसाचार भडकला. तेव्हा अनेक आंदोलकांनी आगी लावल्या. आग लागल्याचे 45 फोन अग्निशमन दलाला आले. आग विझवताना अग्निशमन दलाचे दोन जवान जखामी झाले. तसेच एका अग्निशमन दलाच्या जवानाला जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आला. सर्व जखमी जवानांना इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शनिवारी रात्री CAA समर्थक आणि विरोधकांच्या गटांत हाणामारी झाली. त्यानंतर ईशान्य दिल्लीतील जाफराबाद, मौजपुरा, भजनपुरा भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. या हिंसाचारात आतापर्यंत सातजणांचा मृत्यू झाला आहे, त्यात एका पोलीस शिपायाचाही समावेश आहे.