पँटमधून निघाला कोब्रा, तरुण पडला बेशुद्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका तरुणाच्या पँटमधून कोब्रा निघाला आहे. सुदैवाने हा कोब्रा तरुणाला चावला नाही, अन्यथा तरुणाच्या जिवाला धोका निर्माण झाला असता.

उत्तर प्रदेशच्या झांसी जिल्ह्यात मुकेश नावाचा तरुण रात्री विहरीत पडला. कुटुबींयांनी त्याचा शोध घेतल असता तो विहीरीत आढळला. ज्या विहरीत मुकेश पडला त्यात अनेक साप होते. विहरीत पडल्यामुळे मुकेशच्या डोक्याला लागले होते. मुकेशला विहरीत काढल्यानंतर त्याच्या पँटमधून एक साप निघाला. हा कोब्रा असून त्याने आपला फणही बाहेर काढला होता. ग्रामस्थांनी कसेबसे त्या कोब्राला बाहेर काढले. सुदैवाने तो कोब्रा मुकेशला चावला नाही, अन्यथा त्याचा जीव जाऊ शकला असता. मुकेशला जवळच्या इस्पितळात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. साप पाहून मुकेश खूप घाबरला होता, तो बेशुद्ध पडला होता असे त्याच्या आईने सांगितले.