संत तुकामाई जयंती- माजलगाव-येहळेगाव 230 किमी पायी दिंडीस प्रारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संत तुकामाई येहळेगाव संस्थान यांच्या जयंतीनिमित्त भाविकांच्या वतीने आयोजित माजलगाव ते येहळेगाव अशा 230 किमी पायी दिंडीचा गुरुवारी प्रारंभ झाला. दरकोस दर मुक्काम करत ही दिंडी 12 मार्च रोजी समाधी स्थळी पोहोचणार आहे.

श्री तुकाराम चैतन्य उर्फ तुकामाई हे नांदेड जिल्ह्यातील येहळेगाव येथील रहिवासी, त्यांना चिन्मयानंद या महाराजांनी आशीर्वाद दिला. व तेथून लोक त्यांना तुकामाई म्हणून ओळखु लागले,त्यांनी प.पु.गोंदवलेकर महाराज यांनाही ब्रह्मचैतन्य नांवाने संबोधले होते व मंत्र दिला होता .तुकामाई यांनी आपला देह 1887 मध्ये येहळेगाव येथे ठेवला तेथे त्यांची समाधी आहे. त्यांचा भक्तपरिवार सर्वत्र पसरलेला आहे. येत्या रंगपंचमीच्या दिवशी दि.13 रोजी त्यांची जयंती उत्सव साजरा करण्यात येतो,त्यासाठी गुरुवारी माजलगाव येथील भक्तांची पायी दिंडी निघाली आहे,या दिंडीत महिला-पुरुष सहभागी असून दररोज पायी चालत रात्री मुक्काम होणार आहेत. पाथरी,परभणी, बाराशिव, शिरड शहापूर,शिरळी राजाराम मंदिर, येलकी व दि.12 रोजी येहळेगाव असा या दिंडीचा प्रवास आहे. माजलगाव येथील भक्तांच्या वतीने मागील बारा वर्षांपासून माजलगाव ते येहळेगाव अशा 230 किमी पायी दिंडीत सतिश जोशी, अनंत वाघमारे, बाबासाहेब देशमुख,दत्तात्रय पाठक,अशोक रोडे यांचेसह भाविकांचा समावेश आहे.