
चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत वाढत आहे. जगभरामध्ये आतापर्यंत 3600 जणांचा यामध्ये मृत्यू झाला असून आता कोरोना व्हायरस महाराष्ट्रातही पोहोचला आहे. पुणे शहरात दुबईला जावून आलेल्या एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले होते. मंगळवारी या दाम्पत्याच्या मुलीची, त्यांना मुंबईहून पुण्याला घेऊन येणाऱ्या ओला चालकाची व सहप्रवाशाची तपासणी करण्यात आली असता त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाने यास दुजोरा दिला आहे.
महाराष्ट्र पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट: इसके साथ पुणे शहर में कोरोना वायरस से प्रभावित लोगों की कुल संख्या 5 हो गई है। #CoronavirusOutbreak https://t.co/jcLieZsHI8
— ANI_HindiNews (@AHindinews) March 10, 2020
Three test positive for coronavirus in Pune on Tuesday, total number of confirmed cases in Maharashtra five: state govt
— Press Trust of India (@PTI_News) March 10, 2020
पुण्यातील प्रवासी कोरोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध सुरू आहे. या रुग्णाची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने प्रवास केला तो टॅक्सीचालक, विमानातील सहप्रवासी हे तिघे देखील कोरोनाबाधित असल्याचे उघड झाल्यानंतर पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5 झाली आहे, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच कोरोना विषाणूच्या माहिती व उपचारासाठी राज्य नियंत्रण कक्ष 020 – 26127394 आणि टोल फ्री क्रमांक 104 वर संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
पुण्यातील २ प्रवासी #कोरोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध सुरू. या रुग्णाची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने प्रवास केला तो टॅक्सीचालक, विमानातील सहप्रवासी हे तिघे देखील कोरोनाबाधित; पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५; उपचार सुरू-आरोग्यमंत्री @rajeshtope11 pic.twitter.com/lLDWg4SPUW
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 10, 2020
सोमवारी पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यांच्यावर रुग्ण नायडू हॉस्पिटल, पुणे येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यापैकी एका रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. तर दुसऱ्या रुग्णांमध्ये अद्याप लक्षणे आढळून आलेली नाहीत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि ठिकाणांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. तथापि नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
दरम्यान, दोन्ही व्यक्तींसोबत दुबई येथे गेलेल्या एकूण 40 व्यक्तींची नावे आणि संपर्क क्रमांक प्रशासनाकडे उपलब्ध असून हे विविध जिल्ह्यातील नागरिक असल्याने संबंधित जिल्हा प्रशासन त्यांना संपर्क करून त्यांची तपासणी करण्याबाबत आवश्यक ती कारवाई करत आहे. या दोन्ही व्यक्तींनी ज्या व्यक्तीच्या टॅक्सीने मुंबई वरून पुण्याला प्रवास केला आहे, अशा व्यक्तीची माहिती घेण्यात आली असून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना देखील काल रात्री दवाखान्यांमध्ये दाखल करून घेण्यात आले आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती काढण्यासाठी तसेच अन्य काळजी घेण्यासाठी एकूण पाच पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये महसूल, आरोग्य, पोलीस आणि दोन्ही महानगरपालिकांचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या पथकाद्वारे हे दोन्ही रुग्ण ज्या विभागामध्ये किंवा परिसरामध्ये गेले असतील त्या ठिकाणी कोरोना बाधित अथवा संशयित व्यक्ती आढळून येत असल्यास त्याची खातरजमा करण्यात येईल, असेही ते म्हणाले.





























































