
महाराष्ट्रात आता राजस्थान एनर्जी ऍण्ड इन्स्टमेंट लिमिटेड ही खासगी कंपनी साडेतीन मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. त्यानुसार प्रकल्प उभारणीसाठी कंपनीने नुकतेच टेंडर मागवले आहे.
राज्यात महावितरणचे शेकडो वीज वितरण उपकेंद्रे आहेत. या उपकेंद्रांमध्ये मोठय़ा प्रमाणात रिकामी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या ‘हरित ऊर्जा निर्मिती उपक्रमांतर्ग’त 500 किलो वॅटपेक्षा जास्त क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रकल्प उभारणे, वीजनिर्मिती सुरू करणे आणि पुढील 25 वर्षे त्याची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी टेंडर मागवले आहे. 27 मार्चपर्यंत टेंडर भरणे आवश्यक असून त्यानंतर पुढील वर्षभरात प्रकल्पाची उभारणी करणे संबंधिताला बंधनकारक असणार आहे. दरम्यान, या सौर प्रकल्पात तयार होणारी वीज महावितरणला पुरवली जाणार आहे. महावितरण, महानिर्मिती, एनटीपीसीसह अनेक खासगी कंपन्या जागेच्या उपलब्धतेनुसार सौर प्रकल्प उभारत असल्याने कोळशावरील औष्णिक प्रकल्पावरील भार कमी होणार आहे.


























































