
स्टेट बँकेच्या खातेधारकांसाठी खूश खबर आहे. बँकेत जर तुमचे बचत खाते असेल तर तुम्हाला मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची आता गरज नाही. याबाबत स्टेट बँकेने एक अधिसूचना जाहीर केली आहे. स्टेट बँकेच्या या निर्णयामुळे 44 कोटी 51 लाख खातेदारखांना फायद होणार आहे. तसेच बचत खात्यात मिनिमम बॅलेन्स न ठेवल्याने पूर्वी जो दंड ठोठावला जायचा तोही आता बँकेने आता माफ केला आहे.
या निर्णयामुळे स्टेट बँकेच्या खातेधारकांना ज़ीरो बॅलेन्स खात्याची सुविधा मिळणार आहे. इतकेच नाही तर दर तिमाही बँकेकडून मेसेजे शुल्क आकारले जायचे. तेसुद्धा बँकेने माफ केले आहेत. सध्या बचत खात्यासाठी मिनिमम बॅलेन्सची अट होती. त्यात शहराच्या खात्यांसाठी 3 हजार रुपये, निमशहरासाठी 2 हजार तर ग्रामीण भागातील १ हजार रुपये ठेवण्याची अट आहे. अट न पाळ्यास बँकेकडून दंड आकारला जात होता. या निर्णयामुळे खातेधारकांना फायदा होईल असा विश्वास बँकेचे संचालक रजनीश कुमार यांनी व्यक्त केला आहे.
2018 या वर्षात स्टेट बँक ऑफ इंडियाने बचत खात्यात किमान पैसे ठेवण्याचा नियम भंग करणाऱया ग्राहकांकडून केलेल्या दंडवसुलीतून 1771 कोटी कमवले होते. विशेष म्हणजे ही रक्कम ‘एसबीआय’च्या तिमाही निव्वळ नफ्यापेक्षा जास्त आहे. जुलै ते सप्टेंबर 2017 या कालावधीत एसबीआयचा निव्वळ नफा हा 1581 कोटी इतका होता.
2018 साली बँकेला 944.87 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. दुसर्या तिमाहीत बँकेच्या उत्पन्नात 3 टक्क्यांची वाढ झाली. बँकेला 72,850.78 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. एप्रिल ते जून यादरम्यान बँकेचे उत्पन्न 70,653.23 कोटी रुपये इतके होते. दरम्यान, बँकेने आपल्या कामकाजात पारदर्शकता आणली. 30 सप्टेंबर 2019 रोजी बँकेच्या एकूण एनपीए म्हणजेच बुडीत कर्जात मोठय़ा प्रमाणावर घट होऊन तो 7.19 टक्क्यांवर पोहचला. 2018 साली हाच एनपीए 9.95 टक्के इतका होता.
























































