
हिंदुस्थानात कोरोना व्हायरसचा होणारा प्रसार रोखण्यासाठी परदेशी नागरिकांसाठी हवाई, जल मार्गानंतर आता रस्ते मार्गही बंद करण्यात आले आहेत. हिंदुस्थानबरोबर लागून असलेल्या नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेजवळचे 20 बॉर्डर पोस्ट शनिवारी रात्रीपासून बंद करण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या सीमेशी लागून असलेल्या अटारी बॉर्डर पोस्टची सीमाही सोमवारी रात्रीपासून बंद करण्यात येणार आहे.
जगभरात कोरोनाचे थैमान सुरू असून आतापर्यंत या साथीमुळे हजारो जणांचे बळी गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी सरकारने आधीच परदेशी नागरिकांना हवाई आणि जल मार्गाने देशात येण्यावर बंदी घातली आहे. रस्ते मार्गाने कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी आता हिंदुस्थानला लागून असलेल्या चार देशांच्या सीमाही सील करण्यात आल्या आहेत. यात आसाम, मेघालय आणि त्रिपुराला लागून असलेली बांगलादेशची सीमा, उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंडला लागून असलेली नेपाळची सीमा, पश्चिम बंगालची बांगलादेश, नेपाळ आणि भूतानशी लागून असलेली सीमा आणि मिझोरामशी लागून असलेली बांगलादेश आणि म्यानमारची सीमा बंद करण्यात आली आहे. हिंदुस्थान-नेपाळ सीमेजवळच्या रक्सौल बॉर्डर, उत्तर प्रदेशमधील सनौली बॉर्डर आणि पश्चिम बंगालमधील रानीगंज बॉर्डरही आज रात्रीपासून बंद करण्यात आली आहे.
लष्कराचे जैसलमेरमध्ये हजार बेडचे देखरेख केंद्र
कोरोनाच्या संशयित रुग्णांवर देखरेख करण्यासाठी हिंदुस्थानी लष्कराने जैसलमेर येथे हजार बेडचे क्वॉरेंटाईन सेंटर (देखरेख केंद्र) सुरू केले आहे. या केंद्रात इराणमधून विशेष विमानांनी परत आणलेल्या नागरिकांना ठेवण्यात येणार आहे. महान एअरलाईनच्या विमानाने इराणमधून आज 234 हिंदुस्थानींना मायदेशी आणण्यात आले. यात जास्त करून मुस्लीम भाविकांचा समावेश आहे तर इटलीच्या मिलान शहरातून आणलेल्या 218 हिंदुस्थानी नागरिकांना दिल्लीतील आयटीबीपीच्या छावला केंद्रात ठेवण्यात येणार आहे. डॉक्टर त्यांच्यावर 14 दिवसांपर्यंत देखरेख ठेवणार आहेत.
हिंदुस्थान-बांगलादेश रेल्वे सेवा बंद
रस्ते मार्गाबरोबरच हिंदुस्थान आणि बांगलादेशमधील रेल्वे सेवाही आजपासून बंद ठेवण्यात येणार आहे. हिंदुस्थान आणि बांगलादेशदरम्यान धावणाऱया मैत्री आणि बंधन एक्प्रेसही 15 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
रविवारी आणखी 9 जण पॉझिटिव्ह
देशात रविवारी आणखी 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. केरळमध्ये 3, महाराष्ट्रमधील पिंपरी-चिंचवडमध्ये 5, संभाजीनगरात एक आणि तेलंगणामध्ये एकाला याची लागण झाली आहे. त्यामुळे देशभरात कोरोनाची लागण झाल्याची संख्या 109 वर पोहोचली आहे.
इराणमधील 234, इटलीतील 218 हिंदुस्थानी मायदेशी
इराणमध्ये कोरोनाच्या प्रसारामुळे अडकून पडलेल्या आणखी 234 तर इटलीच्या मिलान शहरातून 218 हिंदुस्थानी हिंदुस्थानी नागरिकांना आज विशेष विमानाने मायदेशी आणण्यात आले. इराणमधील आलेल्या नागरिकांमध्ये 103 भाविक असून 131 विद्यार्थी आहेत. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली. इराणमधून विशेष विमानाने गेल्या मंगळवारी 58 तर शुक्रवारी 44 प्रवाशांना परत आणले आहे. मात्र, अजूनही इराणमध्ये हजारो हिंदुस्थानी नागरिक अडकून पडले आहेत. आखाती देशांपैकी इराणला कोरोनाचा मोठा फटका बसला असून आतापर्यंत तिथे 700 जणांचा बळी गेला आहे तर 13 हजार लोकांना याची लागण झाली आहे.
इंडिगोची यूएईत जाणारी उड्डाणे रद्द
आखातातील यूएईसह अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. त्यामुळे संयुक्त अरब अमिरातीने 17 मार्चपर्यंत सर्वसामान्यांपासून राजनैतिक अधिकाऱयांपर्यंत सगळय़ांना हवाई बंदी लादली आहे. त्यामुळे इंडिगोची हिंदुस्थानातून यूएईतील शारजा, दुबई आणि अबू धाबीला जाणारी काही विमान उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती इंडिगो प्रशासनाने दिली. मात्र, आम्ही अजूनही या हवाई मार्गावरील उड्डाणे रद्द केली नसल्याचे स्पाईस जेट या विमान कंपनीने म्हटले आहे.
बालाजीच्या दर्शनासाठी भक्तांना टोकन
तिरुपती बालाजीच्या मंदिरात आता भाविकांना रांगा लावायला बंदी घालण्यात आली आहे. बालाजीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना विशिष्ट वेळेचे (टाइम स्लॉट) टोकन देण्यात येणार आहे. त्या विशिष्ट वेळेतच दर्शन घेता येणार आहे. दरम्यान, शिखांचे पवित्र स्थान असलेल्या कर्तारपूर साहीबची यात्रा आणि यात्रेची नोंदणी अनिश्चितकालीन काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे.
मध्य, पश्चिम रेल्वेने ब्लॅकेट्स, पडदे हटवले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वेनेही खबरदारीचा उपाय म्हणून एसी ट्रेनमधील दररोज धुतले न जाणारे ब्लॅकेट्स आणि पडदे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. एसी ट्रेनमधील चादरी, टॉवेल, उशीचे कव्हर याच गोष्टी दरदिवशी धुतल्या जातात. कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून रेल्वे खात्याकडून पुढील आदेश येईपर्यंत ब्लॅकेट्स आणि पडदे लावले जाणार नाहीत. प्रवाशांनी घरातून ब्लॅकेट्स आणावे, अशी सूचना मध्य आणि पश्चिम रेल्वेने केली आहे. दरम्यान, ट्रेनमधून दररोज हजारो लोक ये-जा करतात. त्यामुळे प्रत्येक डब्याची स्वच्छता करून ते निर्जंतुक केले जाणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना लिक्विड सोप, नॅपकीन आणि सॅनिटायझर पुरविण्याचे आदेश रेल्वे कर्मचाऱयांना देण्यात आले आहेत.
कोरोनामुळे थायलंडची पर्यटनस्थळे ओस
बँकॉक ः कोरोना विषाणू लागणीमुळे जगातले अनेक देश कोरोना क्हायरसच्या दहशतीखाली आहेत. मात्र, निसर्गाकरही हा परिणाम झाल्याचे समोर आले आहे. थायलंडमध्ये माकडांनी रस्त्याकर उतरून उच्छाद माजकला आहे. कोरोना विषाणूचा परिणाम किकिध देशांतल्या पर्यटनाकर झाला आहे. त्याचा फटका थायलंडलाही बसला आहे. कोरोनामुळे थायलंडमध्ये हॉटेल्स, पर्यटन स्थळे ओस पडली आहेत. त्यामुळे अन्नासाठी यथील माकडे रस्त्याकर उतरून धुडगूस घालत आहेत. देशाची अर्थक्यकस्था पर्यटनाकर अकलंबून आहे. त्यामुळे या देशाच्या अर्थक्यकस्थेकरही परिणाम झाला आहे.
शिर्डी भेट पुढे ढकला!साई संस्थानचे भक्तांना आवाहन
साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी सध्या तरी गर्दी करू नये. शिर्डी भेट काही दिवस पुढे ढकला, असे आवाहन साई संस्थानने भक्तांना केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, गर्दीची ठिकाणी टाळा, असे राज्य सरकारने आवाहन केले आहे. व्यापक जनहित लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून हे आवाहन करण्यात आले आहे, असे श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.
दरम्यान, प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात येणाऱया प्रत्येक भाविकासाठी सॅनिटायझर आणि मंदिर कर्मचाऱयांना मास्क देण्यात आले आहे. भाविक रांगेत उभे असताना आधारासाठी रेलिंगचा आधार घेतात. या रेलिंगही दर 30 मिनिटांनी स्वच्छ करण्यात येत आहेत, अशी माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.
डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण नाही
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे व्हाईट हाऊसमधून सांगण्यात आले. ब्राझीलियन शिष्टमंडळाबरोबर झालेल्या भोजन समारंभावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे शुक्रवारी रात्री यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मात्र, वैद्यकीय अहवालात त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे व्हाईट हाऊसमधील डॉक्टर सीन कोनली यांनी सांगितले.
राणीबाग, तारापोरवाला मत्स्यालय बंद
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून भायखळय़ातील राणीबाग पर्यटकांसाठी आजपासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. राणीबागपाठोपाठ चर्नी रोड येथील तारापोरवाला मत्स्यालयही बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
बिग बीचे ‘रविवार दर्शन’ रद्द
जुहूतील जलसा बंगल्याबाहेर बिग बी अमिताभ बच्चन दर रविवारी चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी चाहत्यांना भेटणे टाळले. ‘मी आज जलसा बंगल्याबाहेर येऊन चाहते आणि शुभचिंतकांना भेटू शकणार नाही. त्यामुळे कृपया गेटबाहेर जमू नका, अशी माझी सगळय़ांना विनंती आहे,’ असे आवाहन अमिताभ यांनी ट्विटरवरून केले. गेल्या 37 वर्षांपासून अमिताभ जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारत आहेत, मात्र आज त्यांच्या चाहत्यांना अमिताभ यांच्या दर्शनाशिवाय परत जावे लागले.



























































