पीटर मुखर्जी चार वर्षांनंतर आर्थर रोड तुरुंगातून बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2012च्या शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीची चार वर्षांनंतर आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली. उच्च न्यायालयाने त्याला फेब्रुवारीत जामीन मंजूर केला होता. मात्र त्या आदेशाला सहा आठवडय़ांची स्थगिती दिली होती. त्या स्थगितीची मुदत गुरुवारी संपल्यानंतर अखेर शुक्रवारी सायंकाळी मुखर्जी तुरुंगातून बाहेर आला. उच्च न्यायालयाने सीबीआयला अपील दाखल करण्यासाठी सहा आठवडय़ांचा वेळ दिला होता. त्यामुळे मुखर्जीला जामीन मंजूर होऊनही तुरुंगात राहावे लागले होते. सीबीआयने मात्र गेल्या सहा आठवडय़ांत मुखर्जीच्या जामीनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले नाही. त्यामुळे मुखर्जीचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग सुकर झाला. त्याला शीना बोरा हत्या प्रकरणात 19 नोव्हेंबर 2015 रोजी मुख्य आरोपी व त्याची पत्नी इंद्राणीसोबत अटक केली होती.