LIVE : नाइलाजाने कलम 144 लागू करावे लागत आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईत 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. रविवारी मध्यरात्रीपासून रेल्वे आणि बससेवा बंद करण्यात येत आहेत. तसेच फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले.

  • विलगीकरण केलेल्यांनी घराबाहेर पडू नये
  • संकट गंभीर असले तर सरकार खंबीर आहे, जनतेने घाबरून जाऊ नये.
  • गरज भासल्यास 31 मार्चनंतरही आपल्याला काही दिवस वाढवावे लागतील.
  • जनतेच्या साथीने आपण कोरोनाला गुणाकार करून देणार नाही, आपण त्याची वजाबाकी करणार आहोत
  • तिसऱ्या आठवड्यात कोरोनाचा गुणाकाराचा टप्पा सुरू होतो, तो आता जवळ आला आहे.
  • आता कोरोनाचा महत्त्वाचा टप्पा आहे, आता आपल्याला काळजी घ्यायची आहे.
  • कंपन्यांनी माणूसकी दाखवत कामगरांना वेतन द्यावे
  • कोरोनाचे जागतिक संकट असून अमेरिका, ईटलीमध्ये गंभीर परिस्थिती आहे.
  • मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची संख्या आता 5 टक्क्यांवर आणली आहे. ते कर्मचारी राज्याचा गाडा हाकणार आहेत.
  • आता या कोरोनाचा गुणाकार सुरू होणार असून कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
  • जीवनावश्यक गोष्टीचींच वाहतूक सुरू ठेवणार
  • रविवारी मध्यरात्रीपासून रेल्वे, बससेवा थांबवणार
  • दूध, भाजीपाला पुरवठा सुरू राहणार
  • आज मध्यरात्रीपासून परदेशातील विमानसेवा पूर्णपणे बंद करण्यात येत आहे.