महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतही लॉकडाऊन, मुख्यमंत्री केजरीवाल यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
arvind_kejriwal

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रात लॉकडाऊन घोषित केला. कोरोनामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यापूर्वी देशातील 75 जिल्ह्यांत बंद घोषित करण्यात आला होता. दिल्लीत 23 ते 31 मार्च लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावशक सेवा सोडून संपूर्ण राज्य बंद राहणाअर आहे. कोरोनाचा प्रभाव पाहता दिल्लीत मेट्रो सेवा 31 मार्च पर्यंत बंद करण्यात आली आहे.

हिंदुस्थानात आतापर्यंत 354 रुग्ण आढळले आहेत. रविवारी कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात सात जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गरज पडल्यास दिल्लीतही लॉकडाऊन करावे लागेल असे संकेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले होते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे महत्त्वाचे आहे असेही त्यांनी म्हटले होते.