पोलिसांनी भर पावसात उभं राहून बजावलं कर्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना या महारोगाने जगात थैमान घातले आसताना जनतेला घरात बसण्याचे आवाहन करतात जनता घरात आसताना पोलीस प्रशासन मात्र उन्ह, वारा आणी पावसात उभे राहून चौकाचौकात लोकांना बाहेर येऊ नका घरात बसा असे सांगताना दिसत आहेत. जामखेड शहरात खर्डा चौकात पोलीस भर पावसात उभे राहून विनाकारण बाहेर येणार्‍या जाणार्‍या लोकांना चांगलाच चोप दिलेला दिसुन आला.

आज सायंकाळी सहा वाजता जामखेड शहरात चांगलाच पाऊस सुरू झाला आणी भर पावसात पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल बापूसाहेब गव्हाणे, आजबे, हिंगशे, अंधारे हे खर्डा चौकात उभे राहून विनाकारण बाहेर येणार्‍या जाणार्‍या लोकांना चांगलाच चोप देताना दिसून आले. सध्या जिल्हा बंदी केलेली आहे त्यामुळे चौकाचौकांत पोलीस उभे राहून लोकांना अडविले जात होते.

उन्ह वारा पावसात आपण आपल्या घरात आहोत पण पोलीस प्रशासन मात्र रात्रं – दिवस रस्त्यावर उभे राहून आपली काळजी घेताना दिसत आहेत. जनतेच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन उन्ह वारा व पावसाची तमा न बाळगता आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. जनतेनेही प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सामना परिवारातर्फे करण्यात येत आहे. भर पावसात उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस प्रशासनास मानाचा मुजरा.