घारापुरी ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंसाठी ग्रामपंचायतीच्यावतीने मोफत वाहन बोट व टेम्पो सेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना वायरस प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाकडून 21 दिवसांचा लाॅकडाऊन करण्यात आले आहे. या काळात घारापुरी बेटावरील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तू व्यवस्थित मिळाव्यात म्हणून ग्रामपंचायतीच्यावतीने घारापुरी ते मोरा अशी बोटसेवा तसेच मोरा ते उरण वाहन (टेम्पो) सेवा मोफत ठेवण्यात आली आहे. त्यासाठी तिन्ही गावातील ग्रामस्थांना लाभ घेता येणार असल्याची माहिती सरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.
तसेच ग्रामस्थांसाठी बाजारहाट, दळणवळण आणि खरेदीचे वार ठरविण्यात आले आहेत. यासाठी उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून बोट व वाहनासाठी पासेसची व्यवस्था केली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने तहसिलदारांचे आभार मानले आहेत. तसेच ग्रामपंचायतीने सदरची व्यवस्था करुन दिल्याबद्दल ग्रामस्थांकडुन कौतुक केले जात आहे.