
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केल्यानंतर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून 23 मार्च ते 1 एप्रिलपर्यंत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल 1585 नागरिकांनी रक्तदान केले आहे.
या रक्तदान शिबीरात केईएम, जेज, नायर, कामा, सायन, वाडिया या रुग्णालयांनी भाग घेतला होता. तर गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या शिबीराला भेट दिलेली, अशी माहिती या मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी दिली आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आज आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री ना. @rajeshtope11 यांनी भेट दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यावर मात करण्यासाठी जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. pic.twitter.com/qJpa4sca2i
— NCP (@NCPspeaks) March 23, 2020



























































