
कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन सुरू असल्याने अनेकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतात आखाडा करून राहत असलेल्या शेतमजुरांना हाताला काम राहिलेले नाही. त्यामुळे गोरगरिबांची उपासमार होत आहे.
ही बाब लक्षात घेता सेलू येथील तरूण शेतकरी गोटू शेरे यांनी पंधरा दिवस पुरेल इतके गव्हाच्या खळ्यावरचे गहू व शेतातील भाजीपाला देत माणूसकीचे दर्शन दिले. या वेळी वसंत (गोटु) शेरे, सेलू जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती अशोक काकडे, रघुनाथ बागल, दत्ता शेरे, विष्णू बागल, पंकज चव्हाण, विनोद शेरे, प्रकाश साखरे, अनिल नवघरे, गोविंद शेरे, आदी उपस्थित होते.






























































