जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर, नियमांचे उल्लंघन करणार्‍याविरुद्ध उगारला कारवाईचा बडगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नियमांचे उल्लंघन करणार्‍याविरुद्ध आज खुद्द नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी याांनी कारवाईचा बडगा उगारलेला आहे. शहरांमध्ये विनाकारण फिरणाऱ्या तसेच मेडिकल दुकानाच्या व किराणा दुकानाचे नावाखाली शहरांमध्ये बोगस फिरणाऱ्या वर कारवाई केली आहे. नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केले तर आम्ही त्यांची वाहने जप्त करून त्यांचे लायसन रद्द करू असा इशारा जिल्हाधिकारी दिवेदी यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. खासगी वाहने वापरण्यास बंदी असताना देखील सुद्धा या नियमांचे उल्लंघन होत असेल तर गुन्हे दाखल करू असे त्यांनी स्पष्ट केले.

 नगर शहरामध्ये दिल्लीगेट, नालेगाव परिसरामध्ये जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रांतअधिकारी श्रीनिवास अर्जुन, यांच्यासह पोलिस पथकाने आज धडक कारवाईमुळे हाती घेतली. शहरामध्ये कर्फ्यू लागू असताना देखील मेडिकल व किराणाच्या नावाखाली अनेक दुचाकी या फिरत आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून आज खुद्द जिल्हाधिकार्‍यांनी या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

या संदर्भामध्ये बोलताना जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, नगर जिल्ह्यात कोरोनाचे 17 रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यांच्यावर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दुसरीकडे नगर शहरामध्ये कायद्याचे उल्लंघन होत आहे. खासगी वाहने रस्त्यावर येता कामा नये असे आदेश दिलेले असताना देखील नागरिक त्याचे पालन करत नाही. सर्वांनी बंदीचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, मात्र ते होताना दिसत नाही. नागरिक मेडिकल, किराणा या सबबीखाली रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे, जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले,