अफवा पसरवल्याबद्दल व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनसह सदस्यावर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हिडीओ फॉरवर्ड करून अफवा पसरविल्याप्रकरणी दानोळी (ता. शिरोळ) येथील ग्रुप ऍडमिनसह दोघाजणांविरुद्ध जयसिंगपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अनिकेत सुरेश पाटील (वय 26) व दीपक गुंडू पाटील (वय 29) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत जयसिंगपूर पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, की दानोळी येथे ग्लोबल सेल्स दानोळी या नावाने व्हॉट्स ऍप ग्रुप आहे. अनिकेत पाटील हा या ग्रुपचा ऍडमिन आहे.

5 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास या ग्रुपवर दीपक पाटील याने आक्षेपार्ह व्हीडिओ फॉरवर्ड केला होता. यानंतर व्हॉट्स ऍपवरून अफवा पसरविल्याप्रकरणी हवालदार विजय पाटील यांनी फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक सूर्यवंशी करीत आहेत.