
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. अशा लॉकडाऊनमध्ये चिकन बिर्याणीची मेजवानी 11 जणांच्या चांगलीच अंगलट आली आहे. बिर्याणीवर ताव मारण्याअगोदर या तरुणांना श्रीगोंदे पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली. प्रशासन योग्य ती खबरदारी, उपाययोजना करत असताना नागरिक मात्र त्याला हरताळ फासत असल्याचे दिसून येते.
याप्रकरणी पोलिस कर्मचारी रघुनाथ साठे यांनी फिर्याद नोंदवली. मांडवगण येथील गोसावीवाडी येथील काही तरुण एकत्र जमून चिकन बिर्याणीची मेजवानी करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांना मिळाली. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास पोलीस पथकाने छापा टाकला. त्यावेळी 11 जण बिर्याणीची मेजवानी करताना आढळून आले.
या प्रकरणी विशाल वाल्मीक कुसेकर (वय 25), वैभव प्रकाश मनवरे (वय 22), गौरव नवनाथ मनवरे (वय 19), राहुल बापू पवार (वय 19), रवींद्र वाल्मीक कुसेकर (वय 29), भाऊसाहेब गोरख पवार (वय 29), अतुल श्रावण चौगुले (वय 20), ऋतिक विठ्ठल जाधव (वय 19), चेतन राजू मनवरे (वय 19), सुरज अशोक मनवरे (वय 19), भास्कर मारुती कुसेकर (वय 22) (सर्व राहणार गोसावीवाडी मांडवगण तालुका) या 11 जणांना ताब्यात घेण्यात आले. वरील अकरा जणांच्या विरोधातभादंवि कलम 188, 269, 270 महाराष्ट्र पोलीस अधिनियमांनुसार कारवाई करण्यात आली.























































