परभणी- संचारबंदी असूनही नदीपात्रात अवैध रेती उपसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्णा गोदावरी नदीच्या पत्रात मागील काही दिवसापासून संचारबंदी सुरू असतानाही अवैध रेती उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे उपविभागीय अधिकारी गंगाखेड यांनी दिनांक 12 एप्रिलच्या मध्यरात्री पथकासह टाकून तीन ट्रॅक्टर जप्त केले. यामधील पावणेचार ब्रास वाळू व तिच्या ट्रॅक्टर पूर्ण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसापासून पूर्णा व गोदावरी नदीच्या पात्रातील कान्हेरखेड, पिंपळगाव, बाळापुर, सुकी कवडगाव, सातेफळ, पेनुर आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रात्री-बेरात्री अवैध रेती उपसा सुरू आहे. या उपशामुळे स्थानिक नागरिकांची झोप उडाली आहे. त्यामुळे मागील काही दिवसापासून उपविभागीय अधिकारी यांनी स्वतः लक्ष देऊन दिनांक 12 एप्रिलच्या मध्यरात्री तालुक्यातील कानखेड शिवारामध्ये पूर्णा नदीच्या पात्रात छापा मारला. त्यांनी मारलेल्या छाप्यामध्ये महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच सव्वीस 3683 व ट्रॅक्टर क्रमांक एमएच सव्वीस 3063 आणि अन्य ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या वाहतूक करून चोरीच्या उद्देशाने विक्रीसाठी वाळू घेऊन जात असल्याचे आढळले.

त्यांनी या घटनेची माहिती त्वरित पूर्णा पोलिसांना दिली. पूर्णा पोलिसांचे पथक शहरांमध्ये दाखल झाले. त्यानंतर पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल हनुमान कुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर तिन्ही वाहनांच्या चालकाविरुद्ध कलम 48 गौण खनिज कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच तीन ट्रॅक्टरसह सहा लाख 15 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक करत आहेत.