Corona Virus Update -देशातील लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. देशात गेल्या 24 तासात 31 जणांचा बळी गेला असून 1211 नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला सकाळी 10 वाजता संबोधित करणार आहेत.

  • कोरोनायोद्धांचा आदर करा त्यांचा गौरव करा
  • कोणाला नोकरीवरून काढू नका
  • शक्य होईल तितकी गरीब कुटुंबांच्या जेवणाची व्यवस्था करा
  • कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य सेतू मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  • रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या सुचनांचे पालन करा
  • लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या लक्ष्मणरेषेचे पालन करा, घरात बनवलेल्या मास्कचा वापर करा
  • घरातील ज्येष्ठांची विशेष काळजी घ्या, आजारी ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या
  • मानव कल्याणासाठी पुढे या, कोरोनाविरोधातील लस शोधण्याचा प्रयत्न करा! पंतप्रधानांचे संशोधकांना आवाहन
  • हिंदुस्थानात आपण कोरोनाग्रस्तांसाठी 1 लाखांहून अधिक खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे
  • वितरणव्यवस्था मजबूत करण्यातय येत आहे
  • औषधांपासून, अन्नधान्यापर्यंत सगळ्या गोष्टींचा मुबलक साठा आहे
  • रबी पिकांच्या कापणीचा काळ आहे
  • पंतप्रधान गरीब कल्याण योजनेद्वारे गरिबांना मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे
  • नियमांत ढील दिलेल्या भाागात जर कोरोनाची लागण झाली तर तिथली ढील मागे घेण्यात येईल
  • जिथे परिस्थिती सुधारेल, हॉटस्पॉटची परिस्थिती निर्माण होणार नाही तिथे 20 एप्रिलनंतर नियमांत थोडी ढील देण्यात येईल
  • तिथल्या कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल
  • 20 एप्रिलपर्यंत गावं, शहरं यातील परिस्थिती बारकाईने पाहण्यात येईल
  • पुढच्या एका आठवड्यात कठोरता आणखी वाढवण्यात येईल
  • नवे हॉटस्पॉट बनणे हे नवी संकटं तयार करणारे असतील
  • हॉटस्पॉटवर विशेष लक्ष केंद्रीत करून तिथे अधिक काळजी घेणं गरजेचं आहे
  • कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू झाला तर ती बाब चिंता वाढवणारी असेल
  • कोरोनाला नव्या भागात पसरू द्यायचे नाहीये, स्थानिक पातळीवर रुग्ण वाढला तर ती चिंतेची बाब असेल
  • देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवला
  • काही राज्यांनी लॉकडाऊनचा कालावधी आधीच वाढवलेला आहे.
  • राज्यांसोबत करण्यात आलेल्या चर्चेनंतर हाच विचार पुढे आला की लॉकडाऊन वाढवण्यात यावा
  • हिंदुस्तानातील कोरोनाविरूद्धची लढाई कशी जिंकू शकतो, लोकांचा त्रास कमी कसा होईल याबाबत राज्यांशी निरंतर चर्चा करण्यात आली
  • कोरोना ज्या वेगाने पसरतोय, त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विविध देशातील सत्ताधाऱ्यांना अधिक सतर्क केले आहे
  • या निर्णयाची खूप मोठी आर्थिक किंमत चुकवावी जरूर लागली आहे मात्र देशातील नागरिकांच्या जीवाच्या मोलापुढे ते काहीच नाहीये
  • सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचा मोठा फायदा देशाला झाला आहे
  • गेल्या काही दिवसातील अनुभव पाहिल्यानंतर आपण जो रस्ता निवडला होता, तोच योग्य आहे
  • हिंदुस्थानने सर्वंकष आणि एकत्रित धोरण आखले नसते, वेगाने निर्णय घेतले नसते तर हिंदुस्थानची स्थिती काय असती याचा विचार करूनही अंगावर काटा येतो
  • काही शक्तिशाली देशांच्या तुलनेत हिंदुस्थान बऱ्याच चांगल्या स्थितीत आहे
  • समस्या दिसल्यानंतर वेगाने निर्णय घेतले आणि संकट रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला
  • कोरोनाचे 550 रुग्ण होते तेव्हा 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली
  • विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी 14 दिवसांचा अलगीकरण आवश्यक केले होते
  • कोरोनाचा एकही रुग्ण हिंदुस्थानात नव्हता तेव्हापासून कोरोना प्रभावित देशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग सुरू केले होते
  • संपूर्ण जगात पसरलेल्या वैश्विक महारोगराईच्या संकटाबाबत आपल्याला माहिती आहे
  • देशातील नागरिक ज्या पद्धतीने नियमांचे पालन करत आहेत, घरात राहून उत्सव साजरे करत आहेत ते प्रेरणादायी आणि प्रशंसनीय आहे
  • निवेदनाच्या सुरुवातीलाच पंतप्रधानांनी बाबासाहेब आंबेडकरांना नमन केले
  • देशासाठी तुम्ही शिस्तबद्ध शिपायाप्रमाणे कर्तव्य बजावत आहात, मी तुम्हाला आदरपूर्वक नमन करतो-पंतप्रधान
  • नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला-पंतप्रधान
  • बऱ्याच प्रमाणात कोरोनाचे संकट मर्यादीत स्वरुपात ठेवण्यात यश आले आहे-पंतप्रधान
  • तोंडाला गमछा/ उपरणे बांधून पंतप्रधानांनी निवेदन केले
  • पंतप्रधानांच्या निवेदनाला सुरुवात
  • क्वारंटाईन केलेल्या संशयित रुग्णांना स्वतंत्र खोली, संसर्ग टाळण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांचे निर्देश
  • जालना शहरात कोरोना पॉझिटिव्ह महिलेसह सारीच्या दोन रुग्णांची प्रकृती चिंताजनक

  • देशातील 1035 रुग्ण कोरोनातून बरे झाले

  • छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एकवीस लाख रुपये