
सध्या सर्वत्र कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच आपापल्या घरी थांबून कोरोनाचा सामना करत आहेत. मोकळ्या वेळात काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच सतावत आहे. आणि जो तो आपल्या परीने त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतोय.
अभिनेत्री माधुरी दीक्षितसुद्धा सध्या असाच काहीसा प्रयत्न करताना दिसत आहे. माधुरी ही बॉलिवूडच्या सर्वोत्तम नृत्यांगनांपैकी ऐक आहे. माधुरीने लहानपणापासूनच कथ्थक या नृत्यप्रकाराचं प्रशिक्षण घेतलं आहे. तिची हीच ओळख आणि आवड सध्या तिला लॉकडाऊनमध्ये मदत करत आहे. पण, यावेळी तिची साथ तिच्या एका जवळच्या व्यक्तिनेच दिली आहे.
माधुरीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात ती तिचा थोरला मुलगा अरिन याच्यासोबत नृत्याची जुगलबंदी करताना दिसत आहे. अरिनने आपल्या आईला तबल्यावर साथ दिली असून काही काळाने तो तिच्यासोबत कथ्थकचे काही तोडेही गिरवताना या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीला उतरत आहे.
पाहा व्हिडीओ-























































