
हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात देशात 1118 कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे तर 39 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वात मोठी वाढ असल्याचे बोलले जात आहे. कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा हा हिंदुस्थानसाठी डोकेदुखी बनत चालला आहे.
India’s total number of #Coronavirus positive cases rises to 11,933 (including 10197 active cases, 1344 cured/discharged/migrated and 392 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/UNpPRwfM6o
— ANI (@ANI) April 15, 2020
सध्या देशात 11933 कोरोनाग्रस्त असून त्यातील 10197 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. तर 1344 रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. तर आतापर्यंत 392 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अगरवाल यांनी ही माहिती दिली आहे. तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात लाल, पिवळा, हिरवा असे तीन झोन तयार करण्यात आले असून त्यातील लाल झोनमध्ये घराघरात जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. सध्या देशात 170 जिल्हे हे लाल झोन मध्ये असून 207 जिल्हे हे पिवळ्या झोनमध्ये आहेत. तर उर्वरित सर्व जिल्हे हे सुदैवाने हिरव्या झोनमध्ये आहेत.’
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत वाढविले आहे. तसेच 20 एप्रिलपर्यंत लॉक़डाऊन अधिक कडक करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
























































