चीनने हिंदुस्थानला फसवलं? 50 हजार पीपीई किट निकृष्ट दर्जाची पाठवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिनी वस्तू या अनेकदा निकृष्ट दर्जाचा असतात असं आपण नेहेमी ऐकतो. संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाशी झुंजत आहे. या परिस्थितीत हिंदुस्थान इतर देशांना शक्य होईल तितकी मदत करत आहे. चीनने मात्र मदतीस तत्पर हिंदुस्थानच्या गळ्यात निकृष्ट दर्जाची पीपीई किट मारल्याचा धक्कादायक दावा केला जात आहे. हिंदुस्थानने टीनकडून दीट कोटी पीपीई किट मागवली होती, जी आज हिंदुस्थानात आली आहेत.

चड्डीत राहायचं! चीनने पाकिस्तानला दिले N95 मास्क ऐवजी अंडरवेअरचे मास्क

 

इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या बातमीत म्हटलंय की चीनकडून 1,70,000 किट आली आहेत. यातील 50 हजार किट ही गुणवत्ता चाचणीत फेल झाली आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO च्या ग्वाल्हेर इथल्या चाचणी केंद्रामध्ये या किटची चाचणी करण्यात आली होती. किटचा दर्जा उत्तम असावा यासाठी काही मानके ठरवण्यात आली आहे. या मानकांच्या आधारे या किटची चाचणी घेण्यात येत आहे. पीपीई किटची गुणवत्ता चाचणी केल्याशिवाय ती पुढे पाठवण्यात येणार नाही असे सांगण्यात आलेले आहे.

जी किट गुणवत्ता चाचणीत नापास झाली आहे ती देशातील मोठमोठ्या कंपन्यांना दानस्वरुपात देण्यात आल्याचं कळतंय. ही किट निकृष्ट दर्जाची निघाल्याने ही तूट भरून काढण्यासाठी नव्याने किट मागवण्यात येणार आहेत. याशिवाय देशांतर्गत किटचे उत्पादन वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे.