संभाजीनगर – तिघेजण कोरोनाबाधीत, गर्भवती महिलेचाही समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बायजीपुरा परिसरातील कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या 17 वर्षीय मुलाच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या आई आणि अन्य दोघांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.

मुंबई येथे राहणारे कुटुंब संभाजीनगरात 10 एप्रिल रोजी आले होते. बायजीपुरा परिसरात हे कुटुंब राहात होते. या कुटुंबातील 17 वर्षीय मुलगा कोरोना पाँझीटिव्ह असल्याचे आगोदर आढळून आले. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या आठ जणाचे स्वॅब घेण्यात आले होते. दरम्यान या 17 वर्षीय मुलाच्या गर्भवती आईला कोरोनाची लागन झालेली असल्याचे आढळून आले असून त्याच्या संपर्कात आलेल्या आरेफ काँलनीतील 39 वर्षीय आणि किराडपुऱ्यातील 2 वर्षीय तरुणाचाही कोरोना तपासणीचा अहवाल यापूर्वीच पाॅझिटिव्ह आलेला आहे.