मुंबई विद्यापीठातर्फे 469 गरीब कुटुंबांना अन्नधान्यांचे वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटकालीन परिस्थितीत मुंबई विद्यापीठाने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे. आदीवासी आणि बिगर आदिवासी गरीब कुटुंबाना दैनदिन जीवनात भेडसावणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्यांचा पुरवठा करण्यासाठी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी पुढे सरसावले आहेत. जवळपास 100 हून अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वयंखर्चातून जवळपास 1 लाख रुपये गोळा करून या गरिब आणि आदिवासी कुटुंबासाठी अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची सोय करुन दिली आहे. या सेवाभावी उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील 314 आदिवासी कुटुंब आणि 155 बिगर आदिवासी कुटुंबांना मदत करण्यात आली आहे.

‘कोरोनाच्या या संकटकालीन परिस्थितीत आदिवासी आणि बिगर आदिवासी कुटुंबाना दैनदिन जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्यांची चणचण भासू नये म्हणून या गरीब कुटुंबाना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने सामाजिक बांधिलकी जोपासत हा उपक्रम हाती घेतला आहे. गरजवंतापर्यंत मदतीचा ओघ असाच अविरत सुरू राहणार.’ – प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ